|
||||
|
Newspapers Magazines Television
Radio Shows |
|
आधाराचा हात... नव्हे पंजा!
बॉम्बस्फोट , डिझास्टरनंतरच्या ताणावर ' अॅनिमल थेरपी ' चा उपाय |
||
|
प्रवीण मुळ्ये , ठाणे बॉम्बशोधक पथकामध्ये किंवा चोरांचा माग काढण्यासाठी उपयोगात येणारे कुत्रे यापुढे बॉम्बस्फोट किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना दुर्घटनेच्या , दु:खाच्या तणावातून बाहेर काढण्यासाठीही धावून येणार आहेत. |
![]() |
|||
|
अॅनिमल थेरपी उपक्रमाचा प्रयोग देशात पहिल्यांदाच होत आहे.
अमेरिकेतील ९/११ ची अतिरेकी घटना , कॅटरिना चक्रीवादळ , लंडन
बॉम्बस्फोट या दुघर्टनांची झळ सहन केलेल्यांच्या मनावरील
दुर्घटनेचा ताण कमी करून त्यांच्यामध्ये जगण्याची नवी उमेद
जागवण्यासाठी अॅनिमल थेरपीचा प्रयोग यशस्वी होतो आहे.
कुत्रा , मांजर यासारखे
पाळीव प्राणी माणसाच्या कुशीत शिरून मनाचा ताण कमी करू शकतात किंवा माणसाला
आपल्याशी गप्पा मारण्यास भाग पाडून मन मोकळे करून घेऊ शकतात... अनेकांना हे
न पटण्यासारखे वाटले तरी विशेष प्रशिक्षण दिलेल्या प्राण्यांनी जगभरातील
पीडितांना नवे आयुष्य दिले आहे. डिझास्टर मॅनेजमण्ेट सेल फॉर मेण्टल हेल्थ
नावाने अनेक प्रगत देशांना परिचित असलेला हा उपक्रम अतिरेक्यांचे टागेर्ट
असलेल्या मुंबईतही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. |
||||