|
|||||
|
Newspapers Magazines Television
Radio Shows |
|
|
|||
|
एक सोबत हवीहवीशी! ठाण्याचं आनंद दिघे जिद्द स्कूल असो किंवा पुण्यातल्या डेक्कनवरचं प्रसन्न ऑटिझम सेंटर. विशेष मुलांना जगणं शिकवणाऱ्या आणि त्यांचं आयुष्य आनंददायी करण्यासाठी धडपडणाऱ्या या शाळांमध्ये सध्या अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. या मुलांच्या दोन छोट्या मैत्रिणी तिथं बागडत आहेत. |
![]() |
||||
|
जिद्द शाळेत आहे कुट्टी; तर प्रसन्नमध्ये सोफी! या मुलांना त्यांच्या कोषातून बाहेर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'अॅनिमल असिस्टेड थेरपी'तल्या या दोघी खंद्या कार्यर्कत्या आहेत. ही वेगळी थेरपी भारतात रुजवण्यासाठी धडपडणारी मीनल लोणकर-कवीश्वर त्यांना या थेरपीसाठी तयार करत आहे. दोघीही आहेत लॅब्रडॉर जातीच्या कुत्र्या. अॅनिमल असिस्टेड थेरपी ही संकल्पना आपल्यासाठी नवीन असली तरी परदेशात मात्र ती मोठ्या प्रमाणात वापरली जातेे. कुत्र्यांसारखे पाळीव प्राणी हे माणसाचे 'बेस्ट फेंड' मानले जातात. तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करतात, तुम्ही दिसायला कसे आहात, नॉर्मल आहात की नाही, तुम्हाला ऐकू येतं का अशा कोणत्याही प्रश्ानंवरून त्यांचं प्रेम ठरत नाही. एकदा त्यांच्याशी नातं जुळलं की तुम्हाला खूष ठेवण्यासाठी ते धडपडतात. बहुतेक हॉस्पिटल्समध्ये आणि सायकॉलॉजिस्ट, सायकिअॅट्रिस्ट या पद्धतीचा वापर करतात, असं मीनल सांगते. मतिमंद, मूकबधीर, ऑटिस्टिक, बहुविकलांग; एवढंच नव्हे तर मानसिक विकार आणि मधुमेह, उच्चरक्तदाब, मानसिक तणावांवरही अॅनिमल थेरपी रामबाण उपाय ठरू शकते. आपल्या वेगळेपणाची जाणीव, समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या वागण्याची समोरच्या व्यक्तीवर काय प्रतिक्रिया उमटेल याचा सतत विचार अशा अनेक विचारांचा गोंधळ त्यांच्या मनात उडालेला असतो. त्यामुळे ही मुलं कोषात जगतात. या थेरपीसाठी कुत्र्यांना किंवा अन्य काही प्राण्यांनाही प्रशिक्षण द्यावं लागतं. परंतु त्यानंतर त्यांच्याशी खेळण्यातून, संवाद साधण्यातून, केवळ त्यांच्याजवळ बसण्यातून मुलांना प्रेरणा मिळते आणि त्यांची इतर उपचार स्वीकारण्याची क्षमताही वाढते. अभिव्यक्ती अधिक सहज होऊ लागते आणि थेरपिस्ट- पेशंट यांच्यामधला दुरावा संपतो. हा प्रयोग मीनलने सर्वप्रथम ठाण्याच्या जिद्द शाळेत
केला. या शाळेच्या प्राचार्य श्यामश्री भोसले यांच्या घरातल्याच कुट्टी या
कुत्रीला प्रशिक्षण देण्यात आलं. या शाळेत मुला-मुलींवर योगा थेरपी, हायड्रो
थेरपी, बिहेविअर थेरपी, डान्स थेरपी अशा अनेक उपचार पद्धती वापरल्या जातात.
|
|||||
Site created by: Mr.Santosh Raut and Ms.Manasi Vartak Inputs by: Mr. Amit Kelkar and Mrs.Minal Kavishwar
© All rights reserved by Animal Angels Foundation